अपहरण प्रकरणातील सराईत गुंडांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश – स्वतः पोलीस अधीक्षकांनी घेतली होती नोंद

बातमी : रवींद्र खुडे, विभागीय संपादक

शिरूर तालुक्यात अलीकडे MIDC मुळे मोठ्या प्रमाणावर गुंडागर्दी वाढलेली आहे. परंतु पोलीस वेळोवेळी या प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून, त्याच्याकडून लाखभर खंडणी घेत त्याच्या डोक्याला पिस्तुल लावत, या प्रकरणाची कुठे वाच्याता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिलेली असतानाही, मोठ्या हिंमतीने त्या व्यक्तीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्वतः या विषयावर लक्ष घालून, अशी गुंड प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्यासाठी मोहीम रबिविली. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील काही सराईत गुन्हेगार व त्यांना साथ देणाऱ्या काहींना पोलिसांनी गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ताब्यात घेतले असून त्यांची माहिती पुढील प्रमाणे.
१) अंकुर महादेव पाबळे, वय वर्ष २६, रा. कावळ पिंपरी, ता. शिरूर, जी. पुणे.
२) माऊली (ज्ञानेश्वर) श्रीकांत पाबळे, वय २५ वर्ष, रा. कावळ पिंपरी, ता. शिरूर, जी. पुणे.
३) विशाल (आण्णा) शिवाजी माकर, रा. ढोक सांगवी, ता. शिरूर, जी. पुणे.
४) दिलीप रामा आटोळे, वय वर्ष ४५ रा. जांबूत (दुडे वस्ती), ता. शिरूर, जी. पुणे.
५) निलेश बबन पळसकर, वय वर्ष ३५, रा. जांबूत, ता. शिरूर, जी. पुणे.
या सर्वांना पाच गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. हे सर्वजण गुन्हा घडल्यापासून सुमारे दीड महिना पोलिसांना फसवत विविध जिल्ह्यांमध्ये फिरत होते. परंतु त्यातील तिघे मुख्य आरोपी हे शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे येणार असून, पर प्रांतात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजल्याने, स्थानिक पोलिसांसह पुणे जिल्ह्याच्या LCB टीमने सापळा रचत त्यांना अलगद ताब्यात घेतले आहे.
या कामगिरीत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB पुणे चे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पोलीस निरीक्षक संजय जगताप, LCB चे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो. ह. तुषार पंदारे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, हेमंत विरोळे, पो. ना. धीरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके तसेच शिरूर पो. स्टे. चे पो. उपनिरीक्षक अभिजित पवार, सहाय्यक फौजदार जी. एन. देशमाने, पो. हवा. नितीन सुद्रिक, पो. ना. बाळू भवर, नाथसाहेब जगताप, व्ही. मोरे, पो. काँ. एन. थोरात, ए. भालसिंग, आर. हळनोर, महीला पो. कॉ. पी. देशमुख आदींनी या शोध पथकात उत्तम कामगिरी केलीय. सदर घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत असुन, आरोपींना शिरूर कोर्टाने २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *