रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि.८ मे २०२१
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने थेरगाव येथिल कैलास मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या *मातोश्री कोविड केअर सेंटर’ चे उद्घाटन रविवारी (दि. 9 मे) दुपारी एक वाजता शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये शिवसेनेच्या वतीने मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
या सेंटरमध्ये सत्तर कोरोना रुग्णांची आयसोलेशनची (विलगीकरण) व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष व महिला वॉर्ड उभारण्यात आला आहे. येथे दाखल होणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चोविस तास सहा डॉक्टर, दहा परिचारीका, वॉर्ड बॉय तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत. शिवसेनेच्या वतीने सर्व रुग्णांना मोफत दोन वेळचा चहा, जेवण, सकाळी नाष्टा, पाणी देण्यात येणार आहे. तसेच गरम पाणी, रुग्णवाहिका, वाय – फाय सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, महिला जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, पिंपरी विधानसभा प्रमोद कुटे, कामगार नेते इरफान सैय्यद, कार्यालयीन सचिव ज्ञानेश्वर शिंदे तसेच शिवसेनेचे सर्व आजी – माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी व शिवसैनिकहि उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिली.