इनरव्हील क्लब चा उपक्रम
नारायणगाव :- (किरण वासगे कार्यकारी संपादक)
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील इनरव्हील क्लब व श्री आदीशक्ती महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर उत्सव हा कार्यक्रम नुकताच पार पडला . या कार्यक्रमासाठी सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. यावेळी खूप साऱ्या महिलांनी मंगळागौर या पारंपरिक खेळात भाग घेतला. तसेच अनेक बक्षिसे जिंकली . हा कार्यक्रम संस्थेच्या संस्थापिका अंजली खैरे यांनी यशस्वीरित्या आयोजित केला.
या कार्यक्रमाला आशाताई बुचके यांनी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचे कौतुक केले..पुढच्या वर्षी मी सुध्धा नवूवारी घालून येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
श्रीराम पतसंस्थेच्या संचालिका राजश्री बेनके यांनी सर्व खेळात सहभाग घेतला.तसेच निता बोरकर,प्रियांका बोरकर,स्मिता विटे ,प्रीती शाह,रश्मी थोरवे ,सुनीता चासकर यांच्या सोबत गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी ग्रामीण मळ्या तळ्यातून महिलांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.