रयत विद्यार्थी परिषदेने कंत्राटी सफाई कामगारांना मिळवून दिला हक्काचा पगार…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २४ जून २०२१
दिर्घ प्रतिक्षेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन कायद्यानुसार हक्काचे वेतन मिळावे यासाठी रयत विद्यार्थी परिषदेने महिन्याभरात ड प्रभाग येथिल 300 सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांना हक्काचा किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळवून दिले.


रयत विद्यार्थी परिषदेने प्रमुख मागण्या जसे कि कामगारांना किमान वेतनानुसार 10 तारखेपर्यत पगार मिळावा.पगार स्लिप मिळावी व बायब्याक पद्धतीने ठेकेदार बेकायदेशीर रित्या रक्कम काढून घेत होते त्या संबंधित ठेकेदारास कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे.


तसेच सफाई कर्मचारी यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी रयत विद्यार्थी परिषदेने तक्रार देऊन पाठपुरावा केला त्याची फळप्राप्ती म्हणून ड प्रभाग अंतर्गत वाकड येथिल आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर सर्व सफाई कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला म्हणून एकमेकिंना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

Advertise

तसेच यावेळी रयत विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी असे मत मांडले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असणा-या सर्व कंत्राटी सफाई कर्मचा-याचे होणारे आर्थिक शोषण थांबवून कामगारांना किमान वेतनानुसार मिळणारा हक्काचा पगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही .यासाठी रयत विद्यार्थी परिषद कटीबद्ध राहील असे मत व्यक्त केले .यावेळी उपस्थित रविराज काळे, ओमकार भोईर, ऋषिकेश कानवटे,अजय चव्हाण आणि सर्व महिला सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *