जपानी भाषा शिक्षणाद्वारे रोजगाराच्या अनेक संधी – डॉ‌. हरी दामले

पीसीसीओई मध्ये जपान मधील करिअरच्या संधी या विषयी परिषद संपन्न

पिंपरी, पुणे

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जपानने प्रचंड प्रगती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या अनेक कंपन्या जपान मध्ये कार्यरत आहेत. याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी जपानी भाषा अवगत केली तर अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा सल्ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जपानी भाषा तज्ज्ञ डॉ. हरी दामले यांनी दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) ‘क्नो जपान’ ही एकदिवसीय जपान मधील करिअरच्या संधी या विषयावर परिषद संपन्न झाली.

पीसीसीओई – जपान सुविधा केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये करिअर करण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे.‌ परिषदेचे हे दुसरे वर्ष होते. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातील संस्कृती आणि माहिती विभागातील वाणिज्यदूत हमुरो मेगुमी, प्रीसिटोर्क ट्रान्समिशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठ, एशियन ब्रिज कन्सल्टिंग प्रा. लि. संचालक उल्हास आचार्य, आयटी तज्ज्ञ वरिष्ठ दुभाषी अजय पंडित, एमएनसी, आयटी, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक योगेश धांदल, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.
करिअरसाठी जपानची निवड का करावी. जपानी भाषेतील प्राथमिक टप्पे कोणते. या भाषा वर प्रभुत्व कसे मिळवावे या विषयी आणि जपानमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल डॉ. दामले यांनी माहिती दिली.
डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी ‘क्नो जपान’ परिषदेबद्दल तसेच विद्यार्थ्यांना जपानमधील इंटर्नशिप, समर स्कूल आणि प्लेसमेंटमधील संधींबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जपानमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संधी, एमईक्सटी शिष्यवृत्ती, खाजगी अर्थसहाय्यित इंटरनॅशनलसाठी मोनबुकागाकुशो ऑनर्स शिष्यवृत्ती व इतर सार्वजनिक आणि खाजगी शिष्यवृत्ती. संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ‘जपानमधील अभ्यास’ तसेच एमईएक्सटीची स्क्रीनिंग प्रक्रिया, जपानी विद्यापीठांचा शोध याविषयी हमुरो मेगुमई यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात नितीन सेठ यांनी जपानमधील ऑटोमोबाईल उद्योग आणि जपानी उद्योगांमधील संस्कृती आणि त्यांच्या कामातील जपानी लोकांचे समर्पण यांचे अनुभव सांगितले. उल्हास आचार्य यांनी विद्यार्थ्यांना जपानमधील करिअरच्या संधी, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधींची माहिती दिली.
अजय पंडित, योगेश धांदल यांनी ही मनोगत व्यक्त केले. सुश्री फुमी आणि इतरांनी शास्त्रीय संगीत सादर केले. ओरिगामी फुलांच्या मांडणीची कला इकेबाना व इतरांनी सादर केली. स्वागत डॉ. रोशनी राऊत आभार गीतांजली झांबरे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थी, शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *