स्टेअर्स फाउंडेशनच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धेला लवकरच सुरुवात

नारायणगाव :- (किरण वाजगे)
युवा कार्यक्रम तथा खेल मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था यांची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन च्या विविध स्पर्धा पुणे जिल्ह्यात लवकरच होणार आहेत.
पुणे शहर व ग्रामीण भागातील वयोगट ८, १०, १२, १४, १७, १९, २२, २५ या वर्षाखालील मुले व मुलींच्या अँथलेटिक्स, टेनिस बॉल क्रिकेट, कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल , कुस्ती आदी खेळाच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
यामुळे स्थानिक खेळाडूंना तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, व आंतर राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण झाले आहे. आगामी काळात शालेय स्पर्धा, खेलो इंडिया, तसे भारतीय क्रीडा प्राधिकरण इत्यादी खेळांसाठी खेळाडूंना नवीन व्यासपीठ निर्माण केले जाणार आहे. तरी पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत बेलवटे (फुटबॉल ), पुणे जिल्हा निरीक्षक विजय तेपुगुडे तसेच स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष बालाजी पाटील जोगदंड आणि सचिव सुनील शिंदे यांनी केले आहे.
स्टेअर्स फाउंडेशन फुटबॉल च्या पहिल्या पुणे जिल्हा मॅचेस स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रद्धा कणसे व शुभंकर कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी विद्यालय , खानापूर, तालुका जुन्नर,जिल्हा पुणे येथे २२ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. स्टेअर्स फाउंडेशन फुटबॉल पुणे जिल्हा मॅचेससाठी अध्यक्ष प्रशांत बेलवटे ९८२२९९००८९ विजय टेपुगुडे ९०९६२६२११४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *