बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

नारायणगाव :- (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)


नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी १६ पिंजरे तैनात

आळे (ता.जुन्नर) येथील‌ तितर मळ्यातील शिवांश अमोल भुजबळ या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने सोमवार दि. ०९ रोजी हल्ला करून ठार केल्यानंतर आज वनविभागाने घटनास्थळी व परिसरात १६ ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
आज दिवसभरात तालुक्याचे आमदार अतुल बेनके , शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, नेताजी डोके, प्रसन्ना डोके, जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, वनक्षेत्रपाल वैभव काकडे, सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच एडवोकेट विजय कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, दिनेश चौगुले यांनी भेट दिली .
दरम्यान भुजबळ कुटूंबाला वनविभागाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यातील दहा लक्ष रुपयांची तातडीची मदत आमदार बेनके यांच्या उपस्थितीत चेक द्वारे भुजबळ कुटुंबियाला देण्यात आली आहे.
दरम्यान वनविभागाच्या वतीने ज्या ठिकाणी बालकावर हल्ला झाला त्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी १६ पिंजरे लावले‌ असून वन विभागाचे वनरक्षक, वनपाल तसेच वन कर्मचारी यांच्याद्वारे परिसरात गस्त घालण्यात येत आहे.

या भागात बिबट्याची दहशत मोठी असल्यामुळे कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *