जाधववाडी मध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत रक्त तपासणी शिबिर- माजी महापौर राहुल जाधव यांचा स्तुत्य उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२५ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


जाधववाडी चिखली मोशी भागातील नागरिकांसाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्तदिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ मंगलाताई राहुल जाधव आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना राहुल जाधव म्हणाले की, कोरोनाचा या काळात आणि वातावरणातील बदलामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच रक्त तपासणी करण्यासाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे . लॉक डाऊन मुळे अनेक नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे म्हणून आपल्याकडून नागरिकांना हि छोटीशी मदत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी २०० नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेतला असे जाधव यांनी सांगितले.

जाधववाडी मध्ये  मोफत रक्त तपासणी शिबिर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *