मांजरी खुर्दचे प्रगतशील शेतकरी शंकर आव्हाळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. १५ ऑगस्ट २०२१
        मांजरी खुर्द, ता. हवेली, जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी, शंकरराव काशिनाथ आव्हाळे (वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे, यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. मांजरी खुर्द प्रासादिक दिंडीचे ते चोपदार होते. इयत्ता चौथीमध्ये असताना, त्यांच्याववडीलांचे छत्र हरपल्याने आईच्या सोबत लहान वयातच प्रापंचिक जबाबदारी पेलत, शेती व्यवसाय सांभाळून त्यांनी कुटुंबाची भरभराट केली. गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होणारे कै. शंकरराव आव्हाळे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, पुतणे, भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोक काशिनाथ  आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या माजी उपसरपंच सुनिता अशोक आव्हाळे या त्यांच्या भावजय होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *