पिंपरी-चिंचवड भाजप कडून कन्या पुजन कार्यक्रम…

11 ऑक्टोबर या जागतीक बाल दिना निमित्त भाजपा बेटी बचाव बेटी पढाओ आघाडीच्या जिल्हा संयोजक प्रिती कामतीकर आणि त्यांचे पदाधिकारी यांनी मनपाचे आकुर्डी हॉस्पिटल या ठिकाणी नुकत्याच जन्मलेल्या पाच बालिका आणि त्यांच्या पाच माता यांचा कन्या पुजन हा कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी त्या पाचही बालीकांना विधिवत पद्धतीने ओवाळून त्यांची पुजा करण्यात आली. त्या बालिका यांना कपडे आणि त्यांच्या माता यांना साड्या भेट म्हणून देण्यात आल्या. त्याच बरोबर त्यांना मोतीचुरचे लाडू भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव बेटी पढाओ या आवाहनाला सर्व समाज बांधवांनी साथ दिली पाहिजे आणि मुलींचा जनमदर वाढविण्यावर भर दिला पाहिजे. मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. प्रत्येक मुलीला प्रत्येक पालकांनी मुला प्रमाणेच दर्जा दिला पाहिजे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता.
घटत्या बाल लिंग गुणोत्तराची ही प्रवृत्ती मागे टाकण्यासाठी आणि याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महिला आणि बाल मंत्रालयाच्या विकास आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने , महिलांच्या संपूर्ण पाठपुरावा आणि सक्षमीकरणामध्ये शिक्षण मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींच्या संरक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आणि त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून ते त्यांच्या आकांक्षा पूर्ण करू शकतील

महिला साक्षरता दर पुरुषांपेक्षा कमी आहे. भारतातील अनेक मुलींची लग्ने लहान वयात होतात आणि सामाजिक दबावामुळे किंवा लवकर गर्भधारणेमुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडली जाते. बालमजुरी आणि स्त्री स्वच्छता उत्पादनांचा अभाव मुलींना शाळेत येण्यापासून रोखतात आणि साक्षरता दर आणि सतत शिक्षणाचा अभाव यामध्ये योगदान देतात. मुली अशिक्षित राहिल्याने, त्यांना कार्यक्षेत्रात प्रवेश करणे अधिक कठीण होते, आणि परिणामी महिलांना स्वतः कठीण आर्थिक परिस्थितीत सापडते.
या सर्वावर मात करण्यासाठी केंद्र शासनाची सुकन्या योजना आणि महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली मुलींसाठी लेक लाडकी या योजने अंतर्गत मुलींना मिळणाऱ्या एक लाख रुपयांच्या टप्प्यांची माहिती देखील आघाडीच्या संयोजिका प्रिती कामतीकर यांनी दिली.
भाजप जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशा नुसार घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी आकुर्डी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ बाळासाहेब होडगर सर त्यांचे सर्व सहकारी तसेच सौ पुनम फके, सौ कांचन डाफने, सौ पल्लवी मारकड, श्री लक्ष्मण टकले आणि भाजप प्रवक्ते, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे आदी सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *