मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पिंपरी चिंचवड शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पुढाकाराने आज शेकडो कार्यकर्त्यांनी
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
“शरद पवार साहेबांच्या शिव-शाहू- फुले-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्या कार्यकर्त्यांवर इथून पुढे कधीही अन्याय होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान यापुढे राखला जाईल, तसेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील ताकदीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल” अशी ग्वाही प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणारे ४० ते ५० ताकदीचे उमेदवार सतत आमच्या संपर्कात असून वेळोवेळी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे पक्षप्रवेश केले जातील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शहरातील युवा चेहऱ्यांना पक्षामध्ये खूप मोठी संधी असून महापालिकेत नव्या दमाचे युवा नगरसेवक पाहायला मिळतील”असे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यावेळी म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीत युवकांना ५०% टक्के तिकिटांची मागणी पक्षश्रेष्ठीं जवळ केली असल्याची माहिती इम्रान शेख यांनी दिली.
यावेळी काळेवाडी भागात युवकांमध्ये प्रसिद्ध असलेले पालिका सभागृहात दोन टर्म नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते राहिलेले काळेवाडी भागातील मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर तसेच ,माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवारांचे एके काळचे रुपीनगर भागातील सहकारी अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल अशोक पवार, व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे खजिनदार आणि स्वराज्य विश्व सेवा ट्रस्ट च्या माध्यमातुन पंधरा वीस वर्षे निगडी ओटास्कीम भागात काम करणारे ॲड. संतोष शिंदे
यांच्या समवेत शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले.के डी वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.
जाकिर मुलानी, कुलदीप बोराटे, जमीलोद्दीन शेख, आशिष जगधने, गौरव मानमोडे, हर्षद परमार, आशिष मोरवडकर, प्रसाद जाधव, विठ्ठल कबाडे, सुजित डांगे,अमोल भारती, सचिन शिंदे, हाजी मलंग शेख, सागर रेड्डी यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.