बेपत्ता असलेल्या इसमाचा अनैतिक संबंधातून खून

हिंजवडी पोलीस ठाणेत दिनांक २५/०२/२०२३ रोजी खबर देणार रेणुका किशोर पवार वय-३० होने खबर दिली की तिचा पती किशोर प्रल्हाद पवार वय-३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. त्याप्रमाणे मनुष्य मिसिंग रजि. नं. १८०/२०२३ प्रमाणे दाखल आहे.

सदर मनुष्य मिसिंगचा तपास सहा पो. फौजदार हरीभाऊ रणपिसे हे करीत असताना नमुद मनुष्या मिसिंग मधील प्रकार हा संशयास्पद असल्याने सर्व शक्यता गृहीत धरून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी हिंजवडी पो.स्टे गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. सागर काटे, स.पो.नि. राम गोमारे व गुन्हे पथकातील अंमलदार यांना मार्गदर्शन करून समांतर तपास करणेबाबत आदेशित केले.

गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना मिसिंग व्यक्ती किशोर प्रल्हाद पवार हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी १७/३० वा. चे सुमारास त्याचा मित्र अक्षय भास्कर खिल्लारे वय-२१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव मु.पो. आसेगांव ता. वसमत जि. हिंगोली याची मोटरसायकल वरून कोटेवरी गेला असल्याची माहिती समोर आली. त्यावरून अक्षय खिल्लारे यांस ताबेत घेवून कसून विचारपुस करीत असताना अक्षय भास्कर खिल्लारे याने सांगितले की, मिसिंग व्यक्ती किशोर पवार याची पत्नी रेणुका पवार हिचेशी त्याचे अनैतिक संबंध आले. याबाबत किशोर याला माहिती झालेने तो त्या दोघांवर संशय घेवू लागला त्यामुळे अक्षय खिल्लारे याने दिनांक २४/०९/२०२३ रोजी किशोर पवार याचा खुन करण्याचे उददेशाने कमरेला विजा अडकावुन किशोर पवार याला फोन वरुन “माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे माझेसोबत चल” असे खोटे सांगुन सायंकाळी ५७/३० वा. त्याचे राहते घरातुन सुसगाव ता. मुळशी जि. पुणे येथून मोटरसायकलवरून वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी जि. पुणेचे जवळ घेवुन जावुन लघवी करण्याचा बहाणा करून पाठीमागुन विळ्याने त्याचे मानेवर व चेहऱ्यावर वार करून त्यास जिवे मारून कोणाला सापडु नये यासाठी त्याचे कपडयाने त्याचे हात-पाय बांधून वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी, जि. पुणे येथे टाकले असे सांगितले. स्थाचे सांगणेप्रमाणे वातील निसिंग व्यक्तीचे प्रेत त्याने दाखविलेल्या घटनास्थळी मिळुन आल्याने त्यास अटक केली.

हिंजवडी पोलीसांनी सदर प्रकरणी गु.र.नं. ११५८/२०२३ भा.द.वि. कलम ३६४, ३०२ २०१ प्रमाणे आरोपी अक्षय भास्कर खिल्लारे वय २१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव मु.पो. आसेगाव ता. वसमत जि. हिंगोली याचेवर गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयात दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ००/५० वा. अटक करण्यात आली असुन हिंजवडी पोलीसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अजितकुमार खटान सहायक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

सदरची कामगीरी विनयकुमार बीचे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त पिंपरी चार डॉ. वसंत परदेसी, अपर पोलीस आयुक्त काकासाहेब पोलीस उपआयुक्त परिमंडपिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय डॉ. विरे वहा पोलीस आयुक्त पकड विभाग पिपरी चिचवड पोलीस आयुक्तालय, मा.श्री विवेक मुगळीकर दरिष्ट पोली निरीक्षक पोलीस ठाणे, सुनिल देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोलीसठाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मार ्गदर्शन व पोलीस टाकडील पाच पथकातील काटे, राम गो मारे, अजितकुमार खाज सहा. पोलीस निरीक्षक बंडू भारणे, बापूसाहेब मा शिंदे सहा. पोलीस उप निरीक्षक पोशिंदे, शिंदे नरेश बलाने प ोलीस नाईक रिलेश कोळी, बीकाणांत मरे, पोलीस शिपाई अमर राणे कारभारी प ओमप्रकाश दत्तात्रय शिंदे, स ागर पंडीत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *