गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी; महाविकास आघाडीची आजही राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

२० डिसेंबर २०२२


विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले.

५० खोके एकदम ओके… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *