अब्दुल सत्तांराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर मोर्चा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सत्तार यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रस्त्यावर उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *