राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली ! पंकजा मुंडे- एकनाथ खडसेंची आज भेट
माजी आमदार,भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. आता “मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे” असं विधान करून पंकजा मुंडेंनी खळबळ उडवून दिली होती तसेच ह्या आधी देखील पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला होता.त्यामुळे आत्ता त्यांची नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुंडे यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची आज पंकजा मुंडेंसोबत भेट होणार आहे.
एकनाथ खडसे हे गोपीनाथ गडावर येणार आहेत आज भाजपचे दिवंगत नेते,माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते गोपीनाथ गडावर येणार असल्याची आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांची त्यांच्यासोबत भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याला कारण आहे भाजप मधील अंतर्गत राजकारण आणि पंकजा मुंडे यांची नाराजीची चर्चा.

तसेच , या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील असे म्हटले कि “गेल्या काही दिवसांपासून पंकजाताई नाराज असल्याचे समजतंय. एकनाथ खडसे हे पूर्वी भाजपात त्यामुळे त्यांचे पंकजाताईंशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची आज भेट होणार आहे. कुठल्याही पक्षात इनकमिंग असतेच. पण पंकजा ताईबाबत माहीत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आत्ता भाजप सोडणार? अश्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर आज पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर काय भाषण करणार ह्याकडे देखील पाहणं महत्वाच ठरणार आहे.