माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पुणे- दि २६ ऑक्टोबर


माजी आमदार विनायक निम्हण यांना आज बुधवार दि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता तीव्र हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या पार्थिवावर आज रात्री नऊ वाजता पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

विनायक निम्हण यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण मुलगा माजी नगरसेवक चंद्रशेखर तथा सनी निम्हण तसेच मधुरा व गायत्री या दोन कन्या तसेच सून जावई व नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड चे माजी नगरसेवक अमित गावडे आणि उद्योजक राहुल गावडे यांचे ते मामा होते. भाऊबीजेच्या दिवशी मामांचे निधन झाल्याने हळहळ वेक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेच्या तिकीटावर ते दोनदा निवडून आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय होते. काँग्रेसच्या तिकीटावर एकदा विधानसभेवर निवडून गेले होते.

त्यानंतर त्यांनी राजकारणातून काढता पाय घेत व्यावसायावर लक्ष केंद्रित केले. मुलगा सनी निम्हण याच्यावर सगळी जबाबदारी देत पुण्यातील सुप्रसिद्ध “सनीज वर्ल्ड ” उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने पुण्यात शोककळा पसरली आहे.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *