छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा – ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा. प .सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या प्रसंगी शिवछत्रपतींचा जन्म सोहळ्याचा प्रसंग सादर केला करण्यात आला.
विद्यामंदिरातील इयत्ता नववी फ च्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी पाळणा गीत सादर केले .या शिवाय शिवछत्रपती शिवराय ,छत्रपती संभाजी, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते .
यावेळी ह-भ-प दर्शन महाराज कबाडी म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दैदिप्यमान होता”. महाराष्ट्राच्या या मातीत राष्ट्रपुरुष जन्मला आले. त्याच भूमीत आपणाला जन्म लाभला. आपण सर्व भाग्यवान आहोत.
छत्रपतिंचे चालणे ,छत्रपतींचे बोलणे ,छत्रपतींचे वर्तन , छत्रपतींची न्यायव्यवस्था आ णि संघटन कौशल्य या सर्वगुणसंपन्नतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकार करावेत.
कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्या मंदीराचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले म्हणाले, छत्रपती शिवाजी राजे म्हणजे शक्ती आणि भक्तीचा संगम होय . स्वतःपेक्षा राष्ट्र हे महान आहे. राष्ट्रासाठी प्राणपणाने लढून त्यांनी स्वराज्य निर्माण केले .
हा महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा आहे. शिवछत्रपतींच्या विचारांचा आहे. पराक्रमी वीर शंभूराजांच्या पराक्रमाचा आहे. याचे आपण ठेवले पाहिजे.
आपले आयुष्य सुखकर जगायचे असेल ,तर महाराजांचा एक तरी विचार आपण अनुसरला पाहिजे .यावेळी विद्यार्थी शर्विल कोल्हे ,सई महामुनी, तन्वी भांबरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने
विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक ,पर्यवेक्षक डी.आर कांबळे, सुनंदा खाडे, रामचंद्र शेगर व विद्यामंदिरातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन के.के.आल्हाट, सु.शि. दुबळे व इयत्ता नववी फ च्या विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *