किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांचे साईटवर मिञाचा खुन करणारा आरोपी जेरबंद…

रावेत पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी नामे दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याच्या रुममध्ये मुंबई पुणे हायवे जवळ रावेत ता.हवेली जि.पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट – खंबा ता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. सदर घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्षे यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२८/२०२३ भा.द.वि. कलम.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळुन गेल्याने मा. पोलीस आयुक्त श्री.विनयकुमार चौबे सो., सह. पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त श्री. परदेशी सोा. यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व आदेश दिले. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी नामे दिनेश रामविलास यादव हा गुन्हा केलेनंतर गेले मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबई बाजुकडे गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना दि. ०७/०९/२०२३ रोजी सपोनि / पी.आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौक कल्याण येथे आहे. अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलीस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलीस स्टेशन येथे आणले. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., सह. पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे सोो, अपर पोलीस आयुक्त श्री. परदेशी सो., पोलीस उप-आयुक्त श्री. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त श्री. पदमाकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / पी आर शिकलगार, सपोनि / विशाल जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र पन्हाळे, पाहवा / ४२५ कोळगे, पोहवा / ६७५ गायकवाड, पोशि/ नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *