माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे अहमदनगरचे जेष्ठ नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीमध्ये निधन…

अहमदनगर,( विभागीय संपादक रवींद्र खुडे, शिरूर )
      माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांची बुधवार दि. १७ मार्च २०२१ रोजी, दिल्ली या ठिकाणी प्राणज्योत मालवली. ते ७० वर्षांचे होते. गेले काही दिवसांपासून, त्यांची प्रकृती बिघडलेली होती. दरम्यान त्यांना कोरोना ची लागण झाल्याचे समजते. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून, भाजपचे माजी खासदार राहिलेले होते.
     दिलीप गांधी हे काही दिवसांपासून, दिल्लीतील  रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी, ही पॉझिटिव्ह आलेली होती. मंगळवारी त्यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती समोर आलेली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना, मंगळवारी दुपारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यानच, बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
    दिलीप गांधी हे अहमदनगर जिल्ह्याचा भाजपचा एक मोठा व प्रमुख चेहरा होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही अकमदनगर पालिका निवडणुकीपासून झाली होती. सुरुवातीच्या काळात ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांची, महापालिकेत भाजपच्या नेतेपदी निवड झालेली होती. ते १९९९ साली अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले होते. जानेवारी २००३ ते मार्च २००४ या काळात, त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवलेले होते. त्यानंतरही ते २००९ ते २०१४ साली, पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले होते.
त्यांच्या निधनाने भाजप चा एक मोठा चेहरा हरवल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *