इंडो अथलेटिक्स सोसायटी च्या वतीने पुणे ते शिवनेरी सायकल राईड चे आयोजन

आग्र्यावरून सुटका या घटनेच्या 356 व्या वर्षा निमित्त इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे पुणे ते शिवनेरी सायकल राईड चे आयोजन ,५७५ सायकल स्वारांचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने दरवर्षी इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे पुणे – शिवनेरी – पुणे अशा २०० किमी सायकल राईड चे आयोजन करते यावर्षी 575 सायकल स्वरांनी यामध्ये सहभाग घेतला. सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे चौथे वर्ष आहे , पर्यावरण आणि आरोग्य याचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमन करते. एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले. शनिवार 2 सप्टेंबर रोजी मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईड ला झेंडा दाखवून सुरुवात झाली यावेळी आय ए एस चे गणेशजी भुजबळ , अजितजी पाटील उपस्थित होते.

आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 साली सुटले होते या घटनेला यावर्षी 356 वर्ष पूर्ण झाली ते आग्रा येथून निघून मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर 30 ऑगस्ट रोजी पोचले होते याच महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आम्ही दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित करतो असे आय ए एस चे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.

पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग – नाशिक फाटा – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – शिवनेरी. असा होता .अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व साईकलिस्ट ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला. असे आय ए एस शिवनेरी सायकल राईड चे प्रमुख श्रेयस पाटील अजित गोरे, अविनाश अनुसे आणि श्रीकांतजी पवार यांच्या तर्फे सांगण्यात आले.

नियोजनामध्ये प्रदीप टाके ,प्रतीक पवार, गिरीराज उमरीकर, अमित पवार, रमेश माने, सुशील जी मोरे , श्रीकांत चौधरी, मारुती विधाते, प्रतीक पवार ,अमित पवार ,मदन शिंदे, दादासाहेब नखाते , प्रशांत तायडे, अविनाश चौगुले, प्रणय कडू , कैलास शेट तापकीर, प्रकाश कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *