गोव्यातील शिवसेना नेत्यांचा शिंदे गटाला पाठींबा नाही – जितेश कामत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ सप्टेंबर २०२२


बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलोही नाही, असं सांगत शिंदे गटात प्रवेशाचा दावा फेटाळून लावला. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं ठणकावून सांगितलं.

एका व्हायरल पोस्टमध्ये १२ राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. मात्र मी एकनाथ शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्याविषयी मला माहिती नाही. माझं नाव त्यात घेऊ नये, कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसतही नाही, कारण मी तिथे नव्हतोच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पद दिलं, मी त्यांच्यासोबतच आहे, असं जितेश कामत यांनी स्पष्ट केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *