यात प्रथम क्रमांक पुणेच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संस्थेने तर द्वितीय क्रमांक औरंगाबादच्या स्वामी समर्थ बालकआश्रम संस्थेने पटकावला आहे
हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार ही मोहीम शेकडो अनाथाश्रमातील वंचित मुलांमधील लपलेल्या कलागुणांचा शोध घेते, त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देते, त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्यांना संभाव्य करिअरकडे निर्देशित करण्यासाठी प्रमाणपत्रे मिळवून देते. नृत्य, संगीत, क्रीडा, शैक्षणिक ज्ञान आणि बरेच काही यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये टॅलेंट हंट्स शोधण्याचा प्रयत्न केअर फॉर यू करीत आहे आहोत. आणि त्या अनुषंगाने काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी पिंपरीतील डि वाय पाटील मेडिकल कॉलेज मध्ये केर फॉर यू च्या हंट फॉर सिक्रेट सुपरस्टारचा प्रश्न मंजुषा ची अंतिम फेरी पार पडली. ज्यात महाराष्ट्रातील विविध अनाथालय मधील विधरायत्यानी आपला सहभाग नोंदवला.
केअर फॉर यू च्या संस्थापिका अध्यक्ष्या पायल सारडा राठी यांच्या नेतृत्वात पार पडला.तसेच अनेक नामांकित कंपन्यांनी ह्या कार्यक्रमास प्रारायोजित केले. जसे की सिल्व्हर ग्रुप, पुनीत बालन ग्रुप. जी. के. असोसिएट्स, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट. तसेच या कार्यक्रमाला कृष्णा डायग्नोस्टिक्स, लाइफ सायन्स, आणि CA करण रांका सारख्या व्यक्तींनी देखील पाठिंबा दिला. या कार्यक्रमाचे अतिथी प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत ननावरे, आयएएस (आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य) आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पोलिस एडीजी फोर्सचे,प्रमुख सल्लागार IPS कृष्ण प्रकाश अहेमदनगर चे अतिरिक्त जिल्हाअधिकारी सुहास मापारी उपस्तित होते तसेच
डॉक्टर . पी. डी. पाटील, पुनीत बालन, संतोष बारणे, विनोद चंदवानी, श्री कृष्णकुमार बूब, श्री नंदकिशोर राठी, राजेंद्र मुठा आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे
या सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत ग्रँड फिनालेचा कार्यक्रम पार पडला आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक प्रसाद बेडेकर यांनी केले.