गांजाची लागवड केल्याप्रकरणी रामदास नामदेव हगवणे वय ६७ याला घोडेगाव पोलिसांनी केली अटक

आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावच्या हद्दित शेताच्या बांधालगत गांजाची लागवड केल्याप्रकरणी रामदास नामदेव हगवणे वय ६७ याला घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास घोडेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश पवार हे करत आहेत.

घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांना एका खबरीने माहिती दिली की, गिरवली गावातील स्मशानभूमीजवळ हगवणे यांच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे. संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम, महेश पवार,पोलिस हवालदार मनिषा तुरे, जालिंदर रहाणे, नामदेव ढेंगळे, होमगार्ड स्वप्नील कानडे,प्रशांत गव्हाणे, गणपत बारवे,संदीप निघोट यांचे पथक तयार केले व रवाना केले. तसेच शासकीय पंचाच्या उपस्थित पाहणी केली असता शेताच्या बांधालगत दोन मोठी गांजा सदृश झाडांची लागवड केलेली दिसून आली.

गांजा असलेला ओलसर हिरवट रंगाचा झाडपाला खोड मूळ सर्व ५ किलो ३५० ग्रॅम आहे. त्याची किंमत १० हजार ७०० रुपये आहे असा मुद्देमाल मिळुन आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *