दबंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा ऑनलाईन पोलिस बदल्यांचा सुखद धक्का, व्हीसीव्दारे २५६ अंमलदारांच्या केल्या बदल्या…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १ ऑगस्ट २०२१
पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त नेहमीच त्यांच्या कार्यातून चर्चेत असतात. त्यांनी ऑनलाइन व्हीसीसीद्वारे २५६ अमलदारांच्या बदल्या त्यांच्या पसंतीनुसार लगेचच गुरुवार व शुक्रवारी केल्या. त्यात तीस जमादार, ९४ हवालदार आणि १३२ पोलिस नाईक यांचा समावेश आहे. त्यांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण आणि हफ्तेखोरीमुळे राज्य पोलिस दल आणि त्यातही मुंबर्ई पोलिस नुकतेच टीकेचे धनी झाले होते. दबंग आणि वेगळे वेक्तिमत्व असलेले पोलीस आयुक्त अशी के पी ची ओळख असल्याने त्यांनी आपल्या अंमलदारांच्या बदल्या पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी २५६ अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या इच्छेनुसारच्या ठिकाणी व्हीसीव्दारे करीत त्यांना सुखद धक्का दिला.

यानिमित्त त्यांच्या अडीअडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयर्न मॅन कृष्णप्रकाश यांची ही बदल्यांची ही वेगळीच संकल्पना आहे. त्यांच्या या ऑनलाईन बदल्यांचा आदर्श राज्यातील इतर आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षक तथा एसपी यांनी घेण्यासारखा आहे. त्यांच्या या नव्या सुखद बदली प्रकाराने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मविश्वास नक्कीच वाढेल असे बोलले जाते.

मात्र, या बदल्या करताना त्यांनी सबंधितांची इच्छा तथा बदलीच्या ठिकाणचा प्राधान्यक्रमही विचारात घेतली. कृष्णप्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे,पोलिस उपायुक्त (मुख्यालय) सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर यांनी बुधवारी (ता. २८) बदलीसाठी पात्र म्हणजे कार्यकाळ पूर्ण झालेल्या अंमलदारांशी व्हिडिओ कॉन्फऱन्स तथा व्हिसीव्दारे संवाद साधला.

त्यांच्या पसंतीनुसार लगेचच गुरुवार व शुक्रवारी त्यांच्या बदल्या केल्या. त्यात तीस जमादार, ९४ हवालदार आणि १३२ पोलिस नाईक यांचा समावेश आहे. त्यांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.या पद्धतीने आणखी ९९ पात्र अंमलदारांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले. अशा बदल्यांमुळे पोलिस दलात उत्साह संचारला असून त्यांचे मनोबल उंचावल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचारी आता नव्या आवडीच्या ठिकाणी जोमाने कामाला लागतील.
आणि भविष्यात कामचुकार पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कडक शासनासही सामोरे जावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *