माळशेज घाटात जमावबंदी हटविल्याने पर्यटकांची गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वर्दळ

राज्य शासनाच्या वतीने जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर येथे वर्षाविहारासाठी तसेच ऐतिहासिक शिवजन्मभूमी व अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने तालुक्यात येत असतात
माळशेज घाटात संततधार पावसामुळे दरड कोसळणे तसेच हुल्लडबाज पर्यटकांच्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वी येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती.
या अनुषंगाने लावण्यात आलेली जमावबंदी नुकतीच हटवल्यामुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे. १५ ऑगस्ट पूर्वी आलेल्या शनिवार रविवारच्या सुट्ट्या तसेच त्यानंतर पतेती सणाची सुट्टी, अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी येथे मोठी गर्दी केली होती.
माळशेज घाट परिसरात तसेच हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर परिसरात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी कशाप्रकारे आनंद घेतलाय याविषयीची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *