सत्तेमध्ये असुनही ज्यांना आपलाच पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही – नाना पटोले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार पडणार नाही, याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे

नाना पटोले म्हणाले की, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *