मुंबई : अभिनेते नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ५ व्यक्तींवर गुन्हा दाखल !

५ ऑगस्ट २०२३
बातमी प्रतिनिधी – प्रसन्न तरडे


प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. ह्या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन तपास सुरु केला आहे. आता त्यामध्ये पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर कला विश्वात एकच खळबळ उडाली होती. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? हा प्रश्न सर्वानाच पडला होता.याचा तपास सुरू असताना या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण आल्याचे दिसत आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी “एडलवाईज” ह्या नामांकित कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या आरोपींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरु झाला आहे.पत्नीने रायगड पोलिसांत दिलेल्या जबाबावरून एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी म्हणून उभं केलं आहे. यामध्ये कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांचा समावेश आहे. त्याचसोबत स्मित शाह, आर.के बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. पत्नी नेहा यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे की, पतीने मानसिक त्रासामुळे स्वतःला संपवलं. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस कंपनीचे अधिकारी कर्जाबाबत पतीला वारंवार मानसिक त्रास देत होते. असं देखील नितीन देसाई यांच्या पत्नी यांनी म्हटले आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी ह्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात काय वेगळे वळण येणार आहे हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांची यंत्रणा वेगाने तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *