महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रवक्ते पदी महेंद्र गणपुले…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.30/5/2021

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रवक्ते पदी महेंद्र गणपुले

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये महेंद्र गणपुले यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्ते पदी बिनविरोध नियुक्ती झाली. महेंद्र गणपुले हे गुरुवर्य देव प्रशाला बोरी खुर्द (ता.जुन्नर) या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. महेंद्र गणपुले यांची राज्याच्या प्रवक्तेपदी निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked