चक्क मित्राने केली मित्राकडे रक्त पिण्याची ईच्छा व्यक्त.दारु पिल्यानंतर मित्र म्हणतो तूझे रक्त पेयचे आहे. आणी काय तोच पाहता पाहता मित्र मित्राच्या गळ्यावर रक्त पिण्यासाठी तुटुन पडतो.
माणुस दारु पिल्यानंतर राक्षस बनतो?
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर येथील
दोन मित्र दारु पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन झाल्यावर मित्राने मित्राकडे मागणी केली की मला तुझे रक्त प्यायचे आहे. आशी ईच्छा व्यक्त केली आणी मित्र मित्राच्या गळ्यावर रक्त पिण्यासाठी तुटुन पडला.
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर येथे काल रात्री ३०२ चा प्रकार घडलेला उघडकीस आला आहे.
संजय गांधीनगर येथील राहुल लोहार,
इस्तियाक ईनामुल खान हे दोघे मित्र काल रात्री दारु पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन झाल्यावर दोघांनमध्ये वाद झाले त्यानंतर मयत झालेल्या व्यक्तीची रक्त पिण्याची ईच्छा झाली त्यावर त्याने त्याचा मित्रा आरोपी राहुल लोहार याच्या गळ्यावर कडाडून जोरदार चावा घेत रक्त प्यायला सुरवात केली. त्यानंतर आरोपी राहुल लोहार हा त्याची सुटका करून निघून गेला. या दोघांनमध्ये काही दिवसांपुर्वी वाद झाले होते तो राग मनात धरून त्याने काही क्षणातच राहुल लोहार याने खानच्या डोक्यात दगड घालून खुन केला. त्यानंतर या घटनेची माहिती भोसरी एमआयडीसी पोलीसांना खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तपासात म्हटले आहे की हे दोघेही रॅकॉर्डवरील आरोपी आहेत. ही कारवाई भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी.आय राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पी.एस.आय सचिन चव्हाण,पी.एस.आय अशोक तरंगे यांच्या टिमने ही कारवाई केली. या पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करित आहे
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल, कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग…