कोकण पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला आली धावून महाशक्ती ॲम्बुलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य..

दि.25/07/2021
बातमी – प्रतिनिधी, दीपक मंडलिक, माळशेज

अचानक उदभवलेल्या चिपळूण आणि परिसरात अनेक घरे उध्वस्त झाली. खाण्यासाठी व प्यायला पाणी नाही. अशावेळी मानवतेच्या दृष्टिकोणातून महाशक्ती रत्नागिरी जिल्हा अंबुलन्स असोशियन आपल्या पदाधिकारी व सदस्य यांच्यासहित मदतीला धावून गेली.
चिपळूण येथे मुरादपुर, पेठ माप, पागनाका, मार्कंडी, चिपळूण बाजारपेठ, खेर्डी, समर्थ नगर सतीची वाडी या ठिकाणी नागरीकाना बिस्किटे, पाणी बॉटल, बेडशीट, दूध, फरसाण, मेणबत्ती, माचिस, मच्छर अगरबत्ती व लहान मुलांसाठी खाऊ इत्यादी वस्तूंची मदत करून रत्नागिरी अंबुलन्स असोसिएशनने खारीचा वाटा उचलण्याचा आला.


  यासाठी चिपळूणवासीयांना मदत पोहोचवण्याची जबाबदारी  महाशक्ती अंबुलन्स कोकण विभाग प्रमुख तन्वीर जमादार सदस्य भाई मयेकर, अजीम फकीर, शिरी किर, जुबेर जमादार, तुषार साळवी, योगेश उत्तेकर, गणेश गोराठे, डॉ. रोहन आंबवकर, हेमंत जोशी, सज्जन लाड, तोफिक काजी, तसवर खान, फिरोज पावस्कर यांच्या सहकाऱ्याने पार पडली.
विशेष सहकार्य डॉ.पदमजा कांबळे व पांडुरंग झापडेकर लाभले.

आणि महाड ला मदत पोहोचवण्याची जबाबदारी रायगड जिल्हा अध्यक्ष आशिष घरत व कोकण संपर्क प्रमुख जाधव व रायगड जिल्हा सचिव नितीन वाडेकर यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा टीम ने पार पाडली. यात सहकार्य संजय ठाकूर महाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
अशी माहिती महाशक्ती अँब्यु लन्स असोसिएशनचे महाराष्ट्र चे अध्यक्ष शरद कात्रजकर यांनी दिली. आणि त्यांनी असेही आश्वासन दिले आहे की कोरोना असो की महापूर असो महाशक्ती ची महाराष्ट्र राज्याची सर्व टीम सदैव तत्पर असेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *