पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी एम्मलॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर यांची निवड

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव जवळ असलेले गाव पोखरकरवाडी,ता.आंबेगाव येथील बजरंग फौजदार पोखरकर यांची पुणे महानगरपालिका पीएमसी एम्प्लॉइज युनियनच्या अध्यक्षपदी वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने निवड करण्यात आली.
तसेच यावेळी जनरल सेक्रेटरी म्हणून बापू पवार, कार्याध्यक्ष वैशाली कुंभार, महिला कार्याध्यक्ष वंदना साळवे, खजिनदार दीपक घोडके व अविनाश गायगावळी यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रदीप महाडिक व जनरल सेक्रेटरी आशिष चव्हाण यांनी मार्गदर्शन तसेच सल्लागारची भुमिका आम्ही बजवणार असल्याचे सांगितले.
पुढील काळात सेवकांचे असणारे प्रश्न मार्गी लावून सेवकांचा विश्वास संपादन करू, असे यावेळी बोलताना अध्यक्ष बजरंग पोखरकर व बापू पवार यांनी सांगितले. तसेच राजू ढाकणे यांनी सुत्रसंचालन व नवीन पदाधिकाऱ्यांचा ठराव मांडला.शेवटी माजी कार्याध्यक्ष भास्कर महाडिक यांनी संभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *