“आसक्या” कथासंग्रहाचा कोरेगाव भीमा विजयस्तंभाजवळ आणि अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धीमध्ये प्रकाशन सोहळा संपन्न

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ जानेवारी २०२२

पिंपरी


नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे कवी वादळकार यांच्या “आसक्या” या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन कोरेगाव भीमा शुरवीरांच्या विजयस्तंभाला मानवंदना देऊन दलित पॅंथरचे अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांच्या हस्ते तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या पदाधिकार्याच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. १ जानेवारी शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्येने दरवर्षी येथे येत असतात. शनिवारी कोरेगाव भीमा शूरवीर विजयस्तंभाजवळ झालेल्या सोहळ्यास सुखदेव सोनवणे, प्रा. राजेंद्र सोनवणे, शुभम सोनवणे, निलेश आल्हाट, विकास भोसले, बाबू वैराट, यवन पोतदार, उषा राजगुरु, साईराजे सोनवणे, सागर सावंत, रशीद शेख आदी उपस्थित होते.

राळेगणसिद्धीला अण्णा सह जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, दीपक सोनवणे, उल्हास पानसरे,अ‍ॅड.संतोष काशीद , योगेश आमले, अण्णासाहेब मटाले, इंद्रजित पाटोळे, मिनानाथ सोनवणे, सुनील पाटे, मंगेश कुटे, नितीन शिंदे, मंगेश तांबोळी, सौ.प्रतिभा दीपक सोनवणे उपस्थित होते. यावेळी सुखदेव सोनवणे प्रकाशन करताना म्हणाले,” सामान्य माणसाला खेडोपाडी जीवन जगत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी अजुनही पराकोटीचा संघर्ष करावा लागतो याचे आसक्याच्या ग्रामीण कथांमध्ये पडसाद उमटले आहे. या लघुकथा ग्रामीण भागातील वंचित, शोषित, उपेक्षित घटकांची वास्तव परिस्थिती कथांमध्ये आहे. ग्रामिण भागातील विविध व्यक्तिमत्व कथांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केला आहे. वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी सहज समजणारी ग्रामीण बोली भाषा त्यांनी वापरली आहे. ग्रामिण भागातील वास्तवाकडे घेऊन जाणा-या “आसक्या” मधील कथा सर्वसामान्यांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *