घोडेगाव बस स्थानकातील खड्डयामुळे प्रवासी त्रस्त

घोडेगाव –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टयातील सर्वात मोठे असणाऱ्या,घोडेगाव बसस्थानकात,पाऊसाच्या पाण्याने नेहमीच बसस्थानकासमोर मोठ मोठे खड्डे होत आहे व या खड्ड्यामध्ये पाणी साचुन डबक्याचे साम्राज्य पसरले आहे.
अदिवासी पश्विमपट्टा तसेच मंचर,जुन्नर,पुणे अशा विविध ठिकाणावरुन प्रवासी नागरिक दररोज,एसटी बसने प्रवास करत असतात.अशातच बस स्थानकात उतरल्यावर खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे,अंगावर घाण पाणी उडणे,पाय घसरुण पडणे अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असुन लवकरात लवकर बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात यावे अशी आतर्व हाक प्रवाशांमधून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *