आ.महेश लांडगे यांच्या हस्ते भोसरी ते पाबळ नविन बस मार्गाचे लोकार्पण : ॲड.नितीन लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


खेड तालुक्यातून हजारो नागरिक रोज पिंपरी, चिंचवड, भोसरी एमआयडी परिसरात कामानिमित्त ये-जा करीत असतात. त्या पैकी वडगाव घेनंद, शेलपिंपळ गाव, पाबळ या भागातील नागरिकांना येण्या – जाण्यासाठी पीएमपीएमएलची व्यवस्था नव्हती. त्या परिसरातील नागरिकांनी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडे याबाबत निवेदन देऊन मागणी केली होती. आ. महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने गुरुवार (दि. १७ फेब्रवारी) पासून भोसरी ते पाबळ ; संतनगर (प्राधिकरण मोशी) ते कात्रज (गुजरवाडी) आणि निगडी ते आळंदी या मार्गांवर पीएमपीची सेवा सुरु करण्यात आली. आ. महेश लांडगे यांच्या हस्ते या तीनही मार्गांवरील बसला हिरवा झेंडा दाखवून गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. संतनगर चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक विलास मडिगेरी, युवा नेते शिवराज सुदाम लांडगे, योगेश लांडगे, योगेश लोंढे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण, शांताराम वाघेरे, बीआरटी विभाग प्रमुख सतिश गव्हाणे, भोसरी बीआरटी प्रमुख काळुराम लांडगे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

भोसरी ते पाबळ; संतनगर ते कात्रज आणि निगडी ते आळंदी पीएमपी बस सेवा सुरु

या विषयी माहिती देताना पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, बस मार्ग क्र. २६४ भोसरी ते पाबळ हा मार्ग भोसरी – आळंदी रोड – मॅगझिन चौक – आळंदी – वडगाव घेनंद – शेलपिंपळगाव – केंदूर चौफुला फाटा मार्गे पाबळ असा आहे. बस मार्ग क्र. ३३९ संतनगर (प्राधिकरण मोशी) ते कात्रज (गुजरवाडी) हा मार्ग संतनगर चौक – भोसरी – नाशिक फाटा – कासारवाडी – बोपोडी – वाकडेवाडी – जंगली महाराज रोड – टिळक रोड – स्वारगेट – कात्रज मार्गे गुजरवाडी असा आहे आणि बस मार्ग क्र. ३४० निगडी ते आळंदी हा मार्ग निगडी – घरकुल – स्पाईन रोड – संतनगर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक (गोडाऊन चौक) – खडी मशीन रस्ता – वडमुख वाडी – अलंकापुरम सोसायटी – पुणे आळंदी रस्ता मार्गे आळंदी असा आहे. निगडी, भोसरी, चिखली – मोशी, प्राधिकरण, च-होली, आळंदी, वडगाव घेनंद, शेलपिंपळगाव, पाबळ तसेच भोसरीतून कात्रज पर्यंत प्रवास करणा-या प्रवाशांना या नविन बस मार्गाचा उपयोग होईल. प्रवाशांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी आ. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली अशीही माहिती ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *