टॉयलेटसेवा अँप ला कॉसमॉस बँकेची पसंती, कॉसमॉस बँकेने पुणे शहरामधील ३९ शाखांमधील स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेटसेवा अँप मध्ये उपलब्ध करून दिली

घराबाहेर पडल्यानंतर भेडसावणारी एक महत्वाची समस्या म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धी आणि त्याविषयीची अपुरी माहिती. सर्वांनाच याचा खूप त्रास होतो. अस्वच्छता मनाला निराश करते, पण याचा सुखद अनुभव येण्यासाठी टॉयलेटसेवा हे एक प्रभावी माध्यम आहे. घराबाहेरील स्वच्छतागृहांबाबतची संपूर्ण माहिती, समस्या, समस्यांचे निराकरण याविषयीची सविस्तर माहिती या अॅपद्वारे मिळू शकते.

अमोल भिंगे हया अनिवासी भारतीयाने आपल्या मातृभूमीसाठी एक छोटीशी टीम बनवून ३- ४ वर्षे मेहनत घेऊन फक्त भारतासाठी आणि फक्त घराबाहेरील टॉयलेटस्साठी हे अॅप तयार केले आहे. हे अॅप iOS आणि Android वरती विनामूल्य डाऊनलोड करता येते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये हे अॅप वापरता येते. ‘हर टॉयलेट क्लीन टॉयलेट’ असे ब्रीदवाक्य असलेले टॉयलेटसेवा हे फक्त अॅप ही एक सामाजिक चळवळ आहे. भारतातील एक लाख तीस हजार टॉयलेटस्चा डेटा या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे. टॉयलेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा या अॅपमध्ये दिसतात. टॉयलेट कुठे लोकेटेड आहे, हेसुध्दा कळते. टॉयलेटसेवा अॅप प्रत्येक टॉयलेटसाठी एक युनिक क्यूआर कोड तयार करते. हा कोड टॉयलेटसेवा अॅपमध्ये स्कॅन केल्यानंतर त्या टॉयलेटचा डॅशबोर्ड दाखविला जातो व त्यात सर्व तपशीलवार माहिती पाहता येते.

कॉसमॉस बँकेने पुणे शहरामधील ३९ शाखांमधील स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेटसेवा अॅपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. कॉसमॉस बँकेच्या कर्मचान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य राखण्याच्या दृष्टीने बँकेने टॉयलेटसेवा या संस्थेबरोबर संयुक्तरित्या हा उपक्रम सुरू केला आहे.

कॉसमॉस बँकेच्या विद्यापीठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयात या सेवेचा शुभारंभ करण्यासाठी एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बँकेतर्फे यावेळी व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे तर टॉयलेटसेवाचे मुख्य प्रवर्तक अमोल भिंगे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *