कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील महान मुलांसाठी चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटल व चाईल्ड कोविड सेंटर करिता पालिकेने नियोजन करावे- विठ्ठल उर्फ नाना काटे माजी विरोधी पक्षनेते

रोहित खर्गे
विभागीय संपादक
आपल्या पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि विशेषत: यातील लहान मुलांची संख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेचे तिसऱ्या लाटेत संक्रमण होत आहे. वैद्यकीय तज्ञाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असून ही बाब विचारात घेता, महापालिकेतर्फे वाय.सी.एम , नवीन जिजामाता , नवीन भोसरी, नवीन आकुर्डी, नवीन थेरगाव, या मनपाच्या रुग्णालयामध्ये लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी वरील रुग्णालयामध्ये योग्य उपचार देणेकामी स्वतंत्र उपचार केंद्र प्राधान्याने तयार करण्यात यावीत.
वैद्यकीय उपाययोजना तयार करताना लहान मुलांवर उपचार करण्यासाठी विशेष बालरोग तज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. कोरोनाच्या काळात मनपाच्या व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आगामी पावसाळ्याच्या तोंडावर कोविड १९ आजाराबरोबरच इतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपचार सुविधा देण्यासाठी सज्ज राहून सेवा द्यावी ही विनंती.
माननीय आयुक्त साहेब वर नमूद केल्याप्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लवकरात लवकर संबधित विभागाला योग्य त्या सूचना देवून लहान मुलांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा निर्माण करव्यात.