शिरूर पोस्ट ऑफिसमध्ये १० ते १३ जुलै पर्यंत आधारची सर्व कामे होणार

शिरूर : दि. ११/०७/२०२३

शिरूर व तालुक्यातील सर्व लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, शिरूर पोष्ट ऑफिसमध्ये सोमवार दि. १० जुलै ते बुधवार दि. १३ जुलै २०२३ पर्यंत आधार कार्ड संदर्भातील सर्व कामे होणार असून, त्याचा फायदा सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन भारतीय पोष्ट (डाक) खात्याच्या बारामती विभागाच्या अधीक्षकांनी केलेय. या विभागातील सर्वच तालुक्यातील पोष्ट ऑफिस मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने शिरूर (घोडनदी) येथील पोष्ट ऑफिस मध्येही शिबिर होत असून, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती (बायोमेट्रिक) साठी १०० रू. व इतर दुरुस्ती साठी ५० रू. तसेच आधार कलर प्रिंट साठी ३० रू. शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व ओरिजनल पुरावे व त्यांची झेरॉक्स कॉपी सोबत आणणे बंधनकारक आहे. त्यात पाच वर्षांखालील मुलांसाठी जन्माचा दाखला त्यासोबतच स्वतः वडील व त्यांचे आधार कार्ड.
सर्वसामान्यांसाठी कोणतेही वैध ओळखपत्र, जन्माचा दाखला किंवा जन्मतारखेचा वैध पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला) ई.
आधार दुरुस्तीसाठी मोबाईल नंबर, वैध रहिवाशी पुरावा, वैध जन्म तारखेचा पुरावा किंवा जो बदल करायचा असेल त्याचा वैध पुरावा ई.
भारतीय डाक विभागाच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले असुन, ते केवळ १० ते १३ जुलै २०२३ या चार दिवसांच्या कालावधीतच होणार असुन, त्याची वेळ सकाळी ९.३० ते ४ वाजेपर्यंत असेल. तरी सर्व इच्छुक नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय डाक (पोष्ट) विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *