माजी नगरसेवक हाजी बशीर भाई तिरंदाज यांचे निधन

शनिवार दिनांक 24 जून रोजी जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हाजी बशीरभाई  तिरंदाज यांचे वयाच्या आठ्यांशीव्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले..
बशीर भाई तिरंदाज यानी जुन्नर नगरपरिषदेचे तीन वेळा नगरसेवक पद भूषविले तर त्यांची मुलगी रेश्मा इनामदार ह्या जुन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होत्या…
बशीर भाई तिरंदाज हे शरदचंद्र पवार व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे विश्वासू व कट्टर समर्थक होते…जुन्नर शहरातील हिंन्दू मुस्लिम  बांधवांचे सलोख्याचे संबंध राहावेत म्हणून बशीर भाई यांचा नेहमी पुढाकार राहत असे…अष्टविनायकातील लेण्याद्री गणपती देवस्थानचे विश्वस्त म्हणून ही बशीर भाई तिरंदाज यांनी काम पाहिले आहे….बशीर भाई तिरंदाज यांच्या निधनाने जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पोकळी निर्माण झाली असल्याची भावना आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली…


बशीर भाई तिरंदाज यांनी भूषविलेली पदे खालील प्रमाणे

संस्थापक चेअरमन : शिवनेर नागरी पत संस्था मर्या., जुन्नर.
माजी प्रांतिक प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य.
माजी अध्यक्ष : प्रोग्रेसीव्ह एजुकेशन सोसायटी, जुन्नर (सेंट ने.र. मुथा इंग्लिश मेडियम स्कूल)
माजी पालक प्रतिनिधी : जुन्नर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ.
माजी खजिनदार : श्री राजा शिव छत्रपति कॉलेज, जुन्नर.
माजी अध्यक्ष : जुन्नर तालुका मुतवल्ली कौन्सिल, जुन्नर.
माजी अध्यक्ष : मोहम्म्दिया फौंडेशन, जुन्नर.
माजी नगरसेवक : जुन्नर नगर परिषद, जुन्नर.
बशीर भाई तिरंदाज यांना आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *