पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचं निधन; शरद पवारांकडून मोदींचं सांत्वन

३० डिसेंबर २०२२


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज पहाटे साडेतीनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं .हिराबेन यांच्या निधनानंतर देशभरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालच पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आज हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदी यांचे सांत्वन केले आहे.

शरद पवारांनी मोदींचं सांत्वन केलं आहे. नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे! त्याबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *