किसान सभेच्या नेतृत्वाखाली चार दिवसा पासुन सुरू असलेल्या उपोषणाला मोठे यश…

  आंबेगाव तालुका - ब्युरो चिफ मोसीन काठेवाडी
एकाच दिवशी विविध पातळ्यांवर मंत्री महोदय पासून उपविभागीय अधिकारी पर्यन्त विविध यंत्रणेसोबत समनव्य प्रस्थापित करून व योग्य तो संवाद साधत आंदोलनाने यश खेचून आनले असल्याने  
     दि. 26 जानेवारी पासुन बुडीत मूळ आंबेगावचे शिल्लक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायतला जोडण्याच्या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते याठिकाणी मुख्यतः आदीम जमातीचे म्हणजेच आदिवासी कातकरी समुदायाचे वास्तव्य आहे.हा समुदाय कधिही फारसा आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यांवर येताना दिसत नाही,जगण्याची विंवचनाच इतकी भयानक आहे की लोकशाही व्यवस्थेला ही ग्लानी येईल. कातकरी समाज राहत असलेली घरे, त्यांच्या नावे होत नाहीत,कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये हे क्षेत्र नसल्याने जन्म,- मरणाची नोंद नाही,रहिवासी दाखले नाही,नविन रेशनकार्ड नाही,असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे होते यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवला होता व हा प्रस्ताव काही त्रुटी दाखवून पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता.पण प्रशासनाने दोन वर्षे या त्रुटींची पुर्तता केली नव्हती.

यामुळे किसान सभा व स्थानिक ग्रामस्थांनी दि 26 जानेवारी पासून उपोषण सुरू केलं होतं व दि.27-1-2021 रोजी मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना कामगार नेते अजित अभयंकर व किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे यांनी प्रत्यक्ष भेटुन हा संपुर्ण विषय त्यांच्यापुढे मांडला.

या चार दिवसांच्या प्रमाणिक उपोषणाची व रुग्णालयात उपोषण कर्ते दाखल केल्याने त्याची गांभीर्यता समजून मा.प्रांत अधिकारी श्री.सारंग कोडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व मा.तहसीलदार,मा.गटविकास अधिकारी, मा.आदिवासी प्रकल्प कार्यलयाचे निरीक्षक यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालय, आंबेगाव, येथे संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत, बुडीत आंबेगाव मधील शिल्लक क्षेत्राला लगतच्या ग्रामपंचायतला जोडण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटीविषयी चर्चा झाली.त्रुटी पुर्ण करून सदरील प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत, विभागीय आयुक्त यांचेकडे जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला.सुमारे दहाही ही उपोषणकर्ते यांची तब्बेत खालवल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले होते.तरी संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला नाही, ताबडतोब नवीन सात कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी उपोषण सुरू केलं.याच दरम्यान सिटू कामगार संघटनेचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड वसंत पवार व dyfi या युवक संघटनेचे डॉ. महारुद्र डाके यांनी या प्रश्नांची गांभीर्यता उपायुक्त श्री.प्रताप जाधव,विभागीय कार्यालय,पुणे यांना भेटून त्यांच्या लक्षात आणून दिली,त्यांनी तातडीने तालुका प्रशासनास सूचना केल्या.

त्याच दिवशी कोल्हापूर येथील किसानसभा व सिटू कामगार संघटनेचे नेते डॉ.सुभाष जाधव व जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री महोदय श्री. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला,त्यांनी हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा अशा सूचना पुणे जिल्हा प्रशासनास दिल्या.या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे दि.29-1-2021 रोजी सायंकाळी 6 वाजता आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी मा.प्रांतसाहेब यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संघटनेच्या प्रतिनिधींशी मते समजावून घेत राज्य शासनाने काढलेल्या सात त्रुटींचे निराकरण करत,त्याविषयी सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेस तात्काळ सादर केला,व त्यांनतर थोड्याच वेळात या अहवालावर जिल्हा परिषदेने आपला अभिप्राय नोंदवत हा प्रस्ताव तातडीने लगेच विभागीय कार्यलय पुणे येथे पाठवुन दिला.

यावेळी तालुका प्रशासन यांच्या वतीने मा.गटविकास अधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना उपोषण मागे घेण्याचे लेखी विनंती पत्र व जिल्हा परिषदेस सादर केलेला अहवाल संघटनेस सादर केलासायंकाळी उशिरा,सदरील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यलयास प्राप्त झाल्यावरच,ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे उपोषणकर्ते यांनी आपले चार दिवसांचे उपोषण सोडले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, मा.प्रदीप पवार, ग्रामीण रुग्णालय, घोडेगावचे अधीक्षक डॉ.चिंचोलीकर सर,इ.
उपस्थित होते.

जोपर्यंत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळुन घरांची नोंद लगतच्या बोरघर ग्रामपंचायतला होत नाही तोपर्यंत चिकाटीने व सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहणार आहे.उपोषणकर्ते यांचे चार दिवसांचे प्रामाणिक व प्राणांतिक उपोषण,पत्रकारमित्र व पोलीस प्रशासन यांचे सहकार्य, कोल्हापूर येथील सिटू व किसान सभेचे नेते कार्यकर्ते प्रा.उदय नारकर,डॉ.सुभाष जाधव,
पुणे येथील कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर,वसंत पवार,डॉ.महारुद्र डाके,
व मुख्य म्हणजे ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय श्री.हसन मुश्रीम साहेब यासर्वांच्या एकत्रित सहकार्याने, मौजे आंबेगाव,बुडीत क्षेत्रातील शिल्लक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायत ला जोडण्याच्या प्रस्तावाचा एक टप्पा पूर्ण झाला

तसेच इतर सर्व संस्था, संघटना व जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल किसान सभेच्या वतीने क्रांतिकारी सलाम व यापुढेही अशीच एकजुट दाखवत कष्टकरी जनतेचा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे.. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राजू घोडे,अशोक पेकारी,कृष्णा वडेकर,सामाजिक कार्यकर्ते बुधाजी डामसे, व स्थानिक ग्रामस्थ नवनाथ वळणे, अशोक वळणे,मंदाबाई मुकणे यांनी केले होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *