तळेघर येथे एटीएम केंद्र व्हावे, बिरसा ब्रिगेडची मागणी

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०५ फेब्रुवारी २०२२

तळेघर


तळेघर हे जवळपासच्या तीस-चाळीस गावातील मध्यवर्ती व बाजाराचे गाव असून येथून पुढे घोडेगाव येथील एटीएम केंद्रावर लोकांना अवलंबून राहावे लागत असल्याने आदिवासी दुर्गम भागाचा विचार करून या ठिकाणी एटीएम केंद्रांची सोय करण्याची मागणी बीरसा ब्रिगेड आंबेगाव च्या वतीने करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी दिली.

तळेघर हे परिसरातील सर्व गावांच्या उलाढालीचे प्रमुख ठिकाण आहे. येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. भीमाशंकर खोऱ्यातील ही एकमेव बँक असल्याने लोकांना पाचशे रुपयासाठी सुद्धा रांगेत उभे राहावे लागते.रविवारी बँक बंद असल्याने तातडीच्या कामासाठी पैसे लागल्यास त्याची कोणतीच सोय येथे उपलब्ध नाही.भीमाशंकर येथील एटीएमही बरेचदा बंद असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांना जवळपास एटीएम ची सोय नसल्याने घोडेगाव पर्यंत जावे लागत आहे. तळेघर येथे एटीएम झाल्याने भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची सोय होईल.

याबाबतचे निवेदन मा.गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना निवेदन दिले होते परंतु याबाबत अजूनही योग्य तो निर्णय घेतला गेला नसल्याने बिरसा ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन आयटी विभागाचे सुरवसे साहेब व इन्फ्रा स्ट्रक्चरल चे डिपार्टमेंटचे शिवले साहेब यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. पुढील मासिक मिटिंगमध्ये हा विषय घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी बिरसा ब्रिगेड आंबेगावचे सोशल मिडिया प्रमुख आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती दादा केंगले आंबेगाव चे सहसचिव सागर कोकाटे, कोषाध्यक्ष विनायक लोहकरे,प्रसिद्धीप्रमुख प्रवीण वाजे तसेच विचारमंचचे प्रदीप पारधी सर शंकर घोडे सर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *