आज देशातील विरोधीपक्ष बिहार मध्ये एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार. पहा कोणते नेते

बिहार मधील पाटणात आज देशातील विरोधीपक्ष एकवटणार आहेत.देशातील बडे नेते बैठकीला उपस्तिथ राहण्याची माहिती समोर येत आहे.कोण कोणते नेते ह्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत पहा.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक बिहार मधील पाटणा शहरात होणार आहे. ही ह्या बैठकीला आगीम निवडणुकी करिती मह्व्ताचा मानला जाताय.या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे . त्यामुळे आता विरोधक ह्या बैठकीच्या माध्यमातून काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.बैठकीला देशातील भाजपविरोधी 15 पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वात या बैठकीचे आयोजन केले आहे. तर या बैठकीला जेडीयू, आरजेडी,कॉंग्रेस, टीएमसी आम आदमी पार्टी,त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.आजच्या या बैठकीमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनिती आखण्यावर चर्चा होणार आहे. भाजपविरोधात देशातील विरोधीपक्षाची मूठ बांधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या अगोदर देखील बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या तसेच त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या सोबत देखील चर्चा केली होती.केंद्रातील भाजप सरकार विरोधात समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे करत आहेत.

पहा कोण-कोणते नेते ह्या बैठकी साठी उपस्थित राहणार आहेत.

आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीता राम येचुरी, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती, दीपांकर भट्टाचार्च हे उपस्थित राहणार आहेत. आत्ता ह्या बैठकीतून क्या निष्पन्न होणार आहे हे येणार काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *