नारायणगाव | दर्जेदार शिक्षणासाठी समाजाचा सहभाग गरजेचा – अमित बेनके

ग्रामीण भागात शैक्षणिक प्रगती साध्य करायची असेल तर समाजाने सातत्याने शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सहकार्याचे बळ देणे गरजेचे आहे.आणि हाच आदर्श नामदार वल्लभ बेनके साहेबांनी आमच्यापुढे ठेवला आहे.जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक उन्नतीतील त्यांचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके यांनी व्यक्त केले.
नारायणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत नामदार वल्लभ बेनके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती आणि मुस्लिम समाज नारायणगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी अमित बेनके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे, जवाहर बाल मंचच्या जिल्हा मुख्य समन्वयक शकिला (सिम्मि) शेख, मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष एजाज आतार, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे,उपाध्यक्ष शशीकांत वाजगे,संचालक अनिल डेरे,अनिल थोरात, अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहत्रे,अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे,रोहीदास केदारी, रामदास अभंग,राजेश कोल्हे, मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त मेहबूब काझी,गफुर तांबळी,हाजी नूरमोहम्मद मणियार,सलीम मणियार,हाजी सलीम मोमीन,एजाज चौधरी, हमीद शेख,मोहसीन शेख,लेखापरीक्षक आमिर तांबोळी,तौसीफ पठाण, जुबेर आतार,रज्जाक शेख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले व शाळा,व्यवस्थापन समितीच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जवाहर बालमंच नवी दिल्ली यांच्या पुणे जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल शकीला (सिम्मी) रज्जाक शेख यांचा आणि शाळेत मुख्याध्यापक पदाचा नव्याने पदभार स्वीकारणारे मोहम्मद आझम शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहबूब काझी यांनी केले. सूत्रसंचालन अकील नलगीरकर व आभार इरफान खान यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *