मोठी बातमी ! मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा – अजित पवार

मुंबई : बुधवार दि.२१ जून रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक मोठे विधान करत
मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता असे विधान करत मला या जबाबदारीतून मुक्त करा
अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते पदी माझे नाव सुचित करण्यात आले आणि आमदारांनी आग्रह करत त्यावर सह्या केल्या तसेच बाकीच्या मंडळींनी देखील मला विरोधीपक्षनेते पदाबाबत सांगितल्यानंतर मी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घेतली. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेत आपले मत व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर पाय उतार झाल्या नंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले या नंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेते सोपवले.त्यानंतर राज्यात अनेक घटना घडल्या.परंतु अजित पवार हे विरोधी पक्षनेते पदाला पुर्ण तादकीने न्याय देत नसून अजित पवार हे फडणवीस आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यावरून आज अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *