कल्याण नगर महामार्गावरील गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केली पहाणी

प्रतिनिधी -कैलास बोडके

उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गालगत ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावांजवळ महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक पांढऱ्या पट्ट्या बसविण्यात आल्याने प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
या महामार्गावर एका पाठोपाठ एक होणाऱ्या अपघातांच्या मालिका कमी करण्यासाठी योग्य त्या उपाय योजने विषयी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार कामाची सुरवात देखील करण्यात आली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण होऊन मजबुतीकरण करण्यात आले संपूर्ण परिसर झपाट्याने शहरीकरणाकडे झेपावला असताना मुंबईकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग अपघातांचे आक्राळ विक्राळ रूप धारण करताना निदर्शनास आल्यानुसार या महामार्गावरील ज्या ठिकाणी अपघातांची प्रमुख केंद्र बनली आहेत. या संपूर्ण परिसरात अद्यापपर्यंत असंख्य अपघात घडून काहीजण बळी देखील गेले आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले असल्याच्या घटना लक्षात घेऊन कांडगे यांनी अपघात कमी कसे होतील यासाठी स्वतः कंबर कसली आहे.
दरम्यान कल्याण नगर महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक , स्पीड ब्रेकर बसवणे नागरिकांना जीवदान ठरणारे आहे, अलीकडच्या काळात रस्ते गुळगुळीत व चकाचक झाल्याने वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे मात्र वेगावर नियंत्रण येण्याकामी उपाययोजनांचा अभाव बघायला मिळत असल्यामुळे ज्या वेगात रस्ते दुरुस्त झालेत त्या वेगात उपाययोजना न राबविल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे अपघातांच्या वाढत्या प्रमानावरून त्यांच्या लक्षात आल्यामुळे सचिन कांडगे यांनी स्वतः पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरुस्तीचे जितेंद्रसिंग ग्रुप या कंपनीचे व्यवस्थापक सतीश बागल व दीपक गुंजाळ यांना संपर्क करून महामार्गावरील उणिवा निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी देखील तात्काळ निर्णय घेत महामार्गावर आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी पांढऱ्या पट्ट्याचे गतिरोधकाचे काम तूर्तास सुरु केले आहे.त्या ठिकाणची पाहणी सचिन कांडगे यांनी स्वतः पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके हवालदार महेश पटारे, सतीश बागल, दिपक गुंजाळ यांना सोबत घेऊन केली असून यामुळे संभाव्य अपघातांना काही प्रमाणात आळा बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *