एफ आर पी ची उर्वरित रक्कम व दिवाळीतील राहिलेला अंतिम हप्ता शेतक-याना लवकरात लवकर आदा करा-स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मागणी

जुन्नर प्रतिनिधी

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी पंचवीसशे रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. परंतु उर्वरित एफ आर पी ची रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा चालू वर्षाच्या 2022 23 च्या गळीत हंगामाचा साखर उतारा 11.59% आहे या साखर उताऱ्यानुसार तोडणी वाहतूक खर्च वजा जाता 27 72 रुपये एफ आर पी ची रक्कम होते एफ आर पी ची उर्वरित राहिलेली रक्कम 272 रुपये तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व दिवाळीचा अंतिम हप्ता 300 शे रुपये शेतकऱ्यांना द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यासह संचालक मंडळाची भेट घेतली.

 

यावेळी झालेल्या चर्चेत चेअरमन यांनी दीडशे रुपये दोन दिवसात जमा करतो व उर्वरित 122 रुपये दिवाळीमध्ये अंतिम हप्त्याच्या स्वरूपात दिले जाईल या गोष्टीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आक्षेप घेतला एफआरपीची राहिलेली पूर्ण रक्कम 272 रुपये ही तातडीने द्या केवळ एफ आर पी वर शेतकऱ्यांची बोळवण करू नका ही रक्कम देऊन कारखान्याला अन्य मार्गाने उपपदार्थातून जो नफा होतो त्या नफ्यातून अंतिम हप्ता तीनशे रुपये द्यावा तरच स्वाभिमानी शेतकरी संघटना ही गोष्ट मान्य करेल अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाची आंदोलन करेल अशी भूमिका घेतल्यानंतर कारखान्याचे चेअरमन यांनी याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले स्वाभिमानी शेतकरी संघटना एफ आर पी ची पूर्ण रक्कम सत्तावीसशे बहात्तर रुपये आणि अंतिम हप्ता दिवाळीचा तीनशे रुपये घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जर याप्रमाणे विघ्नहर कारखान्याने शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे यावेळी शिष्टमंडळामध्ये जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कुटे वनाजी बांगर भूषण आवटी वैभव भिसे संजय पालेकर तुषार भोर आशिष काशीद वसंत गावडे दयानंद भिसे अशोक मानकर हे शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *