तब्बल 40 वर्षांनी श्री विघ्नहर विद्यालयात पुंन्हा एकदा गजबजला वर्ग

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.१७ जून २०२३  :- श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालय ओझर गणपतीचे या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी चाळीस वर्षांनी एकत्र येत पुंन्हा एकदा शाळा भरवली . सण १९८४ सालापासून अगदी कुमार अवस्थेत ही मैत्रीची कुंपण तयार झाली. तिला उजाळा देण्यासाठी मित्र मैत्रिणींची अनोखी गाव भेट घडवण्याचा सुवर्णयोग अकरा जून २०२३ ला जुळून आला.आणि विघ्नहराच्या पवित्र भूमीत श्री विघ्नहर विद्यालयात स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला ३४ मुले आणि ११ मुली असे एकूण ४५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली .मेघा बेनके यांनी प्रार्थना म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात गोसावी सर व बोराडे सर यांच्या हस्ते गणेश पूजन व सरस्वती पूजनाने झाली. या प्रसंगी विद्यमान मुख्याध्यापक साबळे सर, गणेश राऊत सर, संतोष सगर सर, भोर मॅडम व बेल्हेकर मॅडम व सहकारी उपस्थित होते. यावेळी गोसावी सर व भोर
मॅडम यांनी मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. व मुलांचे कौतुक करत माझे वय आणि १९८४ च्या बॅच चा अनोखा योगायोग सांगितला. बेल्हेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव केला तर भोर मॅडम यांनी तुम्ही रिटायर झाल्यावर कोणत्या गोष्टी करायच्या याचे मार्गदर्शन केले व सर्वांना आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्यास सल्ला दिला. श्री आनंद मस्करे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन बाळकृष्ण हांडे यांनी केले .माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख , आपले कार्यक्षेत्र ,आपली कौटुंबिक माहिती अगदी न लाजता सर्वांना सांगितली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण घेगडे यांनी केले . तर कार्यक्रमाच्या मध्यान हॉटेल आर्या ओझर या ठिकाणी सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. या ठिकाणी मच्छिंद्र कवडे, अरुण गाडेकर, प्रताप बेनके ,प्रमोद शिंदे, सुमन दांगट ,मेघा बेनके ,रोहिणी जोगळेकर, मीरा भोर ,बबन मांडे ,विठ्ठल कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र कवडे यांनी आरोग्यविषयक व प्रमोद शिंदे यांनी व्यवसायात आपण कशी प्रगती करावी याचे मार्गदर्शन केले. या भेटीसाठी अनेक वर्ष दुरावली गेलेली मित्रत्वाच्या नात्यांची गुंफण पुन्हा एकदा जोडली गेली आहे असे मत प्रत्येक जण आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना प्रकट करत होता. आणि विविध क्षेत्रात काम करणारे आपले मित्र वेळप्रसंगी आपल्या मित्रांना मदत करतील व आपण एकमेकांना कायम भेटत राहू अशी इच्छा यावेळी सर्वांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रताप बेनके, किरण घेगडे.विठ्ठल कवडे ,विजय कवडे ,बाळासाहेब गवळी ,अनिल भोर, राजेंद्र टेंभेकर ,बबन मांडे ,संजय शिंदे दिलीप मांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास अशा भोजनांने झाली तर बाळकृष्ण हांडे यांनी सर्वांचे आभार मानून , पुढल्या वर्षी पुन्हा एकदा भेटण्याचा आशावाद सरते शेवटी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *