श्रीमती एस.आर.केदारी बालकमंदिरमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके

दि.१७ जून २०२३ :- ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर. केदारी बालक मंदिर मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इ.१तील विद्यार्थ्यांचे मोठ्या आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता पारखे मॅडम यांनी केले.


या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त मा.श्री.डॉ. विद्वांस सर तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशमामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष मा. श्री अनिल तात्या मेहेर सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह मा.श्री रविंद्र पारगावकर सर, बालकमंदिर शाळेचे चेअरमन मा. श्री.अरविंदभाऊ मेहेर सर,अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन मा.श्री.डॉ. आनंद कुलकर्णी सर तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय समितीचे अध्यक्ष मा. श्री रमेश जुन्नरकर सर,बालक मंदिर समितीचे सदस्य मा. श्री.शशिकांत वाजगे सर, बालकमंदिर समितीच्या सदस्या मा.सौ. मोनिकाताई मेहेर, बालकमंदिर समितीचे सदस्य मा.श्री.देविदास भुजबळ सर, ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडीचे चेअरमन मा. श्री.आल्हादशेठ खैरे सर, ग्रामोन्नती मंडळाचे कृषी तंत्रनिकेतन माळी प्रशिक्षण वर्ग व शेती समितीचे चेअरमन मा.श्री. रत्नदीप भरविरकर सर इ.पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ सुनिता पारखे मॅडम व उपमुख्याध्यापिका मा. सौ.अरुणा कानडे मॅडम या सर्वांनी नवोगतांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजावट करून सुशोभित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील संगीत शिक्षक श्री. राहुल दुधवडे सर यांनी आपल्या सुमधूर आवाजात गणपतीचे गीत व बालगीत सादर केले. शेवटी विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना गोड गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगिता बांगर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *