डिंगोरे येथील राजा हरिचंद्र पतसंस्थेची निवडणूक बीनविरोध

येथील राजा हरिचंद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली, त्यात सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर यांचेकडील दि.24/05/2023 रोजीचे आदेशाने श्री. संतोष भरत भुजबळ यांची संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रथम सभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांमधून पदाधिकारी निवड करणेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती
त्यानुसार त्यांनी निवडणूक सभा नोटीसीने संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळात निवडून आलेल्या सदस्यांमधून चेअरमन व व्हा.चेअरमने निवडीची सभा आज सकाळी शनिवार दिनांक 10/06/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
संस्था कार्यालय डिंगोरे येथे घेण्यात आली त्यास
सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते
एकमेव नावाची सूचना सभेपुढे प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी यांनी श्री विश्वास बाबुराव आमले यांची अध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले, रमेश सखाराम मवाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले
अध्यासी अधिकारी यांनी निवडून आलेल्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ पुढील कामकाजाकरता शुभेच्छा देऊन दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *