आंबेगाव वसाहती मध्ये मुलांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा-

आंबेगाव वसाहत येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .
शैक्षणिक वर्ष 2023/24 मधील इयत्ता पहिलीच्या व पाचवीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती असलेला फेटा बांधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनी व मान्यवरांनी नवगतांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प दिले. या प्रसंगी प्रकाशराव घोलप माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, उपसरपंच परवीन भाभी पानसरे , ग्रामपंचायत सदस्य विजुभाऊ घोलप ,पुनम घोलप,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ घोलप, शिक्षण समिती अध्यक्ष राजाभाऊ पानसरे , मा .विस्तार अधिकारी शेंगाळे साहेब व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश ठाकुर यांनी आपल्या मनोगतात शालेय उपक्रम,स्पर्धा परीक्षा याबद्दल माहिती सांगत विद्यार्थांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला या शाळेतील प्रवेश योग्य ठिकाणी झाल्याची ग्वाही दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश घोलप यांनी दोन्ही विद्यालयांना भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरूम साठी आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सौ. शर्मिला कोकणे,माध्यमिक व प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व नवागतांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *